बातम्या
कोरड्या जूननंतर जुलैचा जल्लोष; धरणांनी घेतला दिलासादायक श्वास!
By Administrator - 6/7/2026 1:09:04 PM
Share This News:
कोरड्या जूननंतर जुलैचा जल्लोष; धरणांनी घेतला दिलासादायक श्वास!
घाटमाथ्यावर मुसळधार; धरणे भरू लागली, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा बहरल्या!
अवघ्या काही दिवसांपूर्वी धरणांतील घटता पाणीसाठा चिंतेचा विषय ठरत होता... पण जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने अशी मुसंडी मारली की, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचे चित्रच बदलू लागले आहे."
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या दमदार पावसाचा थेट परिणाम आता धरणांमध्ये दिसू लागला आहे. राधानगरी आणि तुळशी धरणांनी 45 टक्के, तर वारणा धरणाने 42 टक्के पाणीसाठा गाठला आहे. जंगमहट्टी धरण 43 टक्क्यांवर, तर घटप्रभा धरण शंभर टक्के भरलं आहे. आंबेओहोल धरण 63 टक्के, तर जांबरे धरण 70 टक्के पाणीसाठ्यावर पोहोचलं आहे.
हा वाढता साठा म्हणजे केवळ आकडे नाहीत... तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर परतलेला विश्वास आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या चिंतेत असलेला जिल्हा आता पावसाच्या बळावर हळूहळू सावरताना दिसतोय.
मात्र, पाऊस असाच कायम राहिला तर काही धरणांमधून विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणं तितकंच महत्त्वाचं आहे.
"एका दमदार पावसाने चिंता आशेत बदलली आहे... आता नजर आहे ती याच पावसाचा वेग कायम राहतो का आणि कोल्हापूरच्या धरणांमध्ये आणखी किती जलसाठा वाढतो याकडे.
कोरड्या जूननंतर जुलैचा जल्लोष; धरणांनी घेतला दिलासादायक श्वास!
|