बातम्या

वय अवघं ३ वर्षे, कामगिरी थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये; मानस कुराडेचा डंका!

Just 3 years old and his achievement has landed him straight in the India Book


By nisha patil - 12/11/2026 2:04:10 PM
Share This News:



वय अवघं ३ वर्षे, कामगिरी थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये; मानस कुराडेचा डंका!

 

वय अवघं तीन वर्षे पाच महिने... पण या चिमुकल्याची बुद्धिमत्ता आणि कौशल्य पाहून भलेभले थक्क होतील! गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी येथील मानस रोहिदास कुराडे याने आपल्या असामान्य कौशल्याच्या जोरावर थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलं आहे. त्याला 'आयबीआर अचिव्हर' (IBR Achiever) हा किताब जाहीर झाला असून, त्याच्या या यशामुळे कुराडे कुटुंबासह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मानसचा जन्म ३० एप्रिल २०२३ रोजी झाला. अवघ्या तीन वर्षे पाच महिन्यांच्या वयात त्याने अनेक कौशल्ये आत्मसात केली आहेत. स्केच पेनच्या साहाय्याने कागदावर इंग्रजी वर्णमालेतील A ते Z ही सर्व २६ कॅपिटल अक्षरे लिहिण्याची कामगिरी त्याने केली आहे. विशेष म्हणजे, ही सर्व अक्षरे लिहिण्यासाठी मानसला अवघा १ मिनिट ५५ सेकंदांचा वेळ लागतो.

एवढंच नव्हे, तर मानसने ३० प्राणी, १८ फळे आणि १६ भाज्यांची अचूक ओळख पटवून दिली आहे. तसेच एक ते दहा अंकही अचूक मोजून दाखवले आहेत. त्याच्या या कौशल्यांची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या संपादकीय मंडळाने सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी केली. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी या कामगिरीला अधिकृत मान्यता देण्यात आली.

अगदी बालवयातच आपल्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची छाप उमटवणाऱ्या मानसने येणेचवंडी गावासह गडहिंग्लज तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यात मानस आणखी मोठी भरारी घेईल, अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.


वय अवघं ३ वर्षे, कामगिरी थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये; मानस कुराडेचा डंका!
Total Views: 12