विशेष बातम्या

‘जरा याद करो कुर्बानी’ने शहाजी महाविद्यालयात देशभक्तीचे वातावरण

Just remember the sacrifice


By nisha patil - 8/8/2025 2:44:09 PM
Share This News:



‘जरा याद करो कुर्बानी’ने शहाजी महाविद्यालयात देशभक्तीचे वातावरण

क्रांतीकारकांचे स्मरण, विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठरले भावस्पर्शी

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या शहाजी महाविद्यालयात क्रांती दिनानिमित्त ‘जरा याद करो कुर्बानी’ हा कार्यक्रम हिंदी विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या रूपात मनोगत व्यक्त करत देशभक्तीपर गीत सादर केली. भिंतीपत्रकाच्या माध्यमातून क्रांतिकारकांचे योगदानही उभे करण्यात आले.

या उपक्रमास चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे व प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे मार्गदर्शन लाभले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस. एस. पाटील यांनी, सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता रेणुसे यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. सारिका कांबळे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘जरा याद करो कुर्बानी’ने शहाजी महाविद्यालयात देशभक्तीचे वातावरण
Total Views: 60