बातम्या

संसार सांभाळत ज्योती'ने मिळवले 79.00 %

Jyoti who manages the world scored 79 00


By nisha patil - 5/5/2025 8:51:22 PM
Share This News:



संसार सांभाळत ज्योती'ने मिळवले 79.00 %
 

कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिकणारी ज्योती दादासो चव्हाण हिने शिक्षणातील सहा वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा बारावीसाठी प्रवेश घेऊन कला शाखेत 79 % गुण मिळवले. कुशिरे (ता. पन्हाळा) या दुर्गम भागात राहणाऱ्या ज्योती चव्हाण हिने ग्रामिण भागात 6 जणांचे कुटूंब संभाळात कला शाखेत 79% गुण मिळवत यश मिळवत महाविद्यालयात कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला.
 

ज्योतीचे दहावीनंतर लगेचच लग्न झालं. लग्नानेतर शिक्षणात 6 वर्षाचा खंड पडला. एक मुलगी व संसार सांभाळत तिने शिक्षणाची प्रकिया पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. सकाळी पतीदेवांचा डबा, घरचे जेवण, मुलगी सांभाळत शिक्षणाची आवड जपली. घर संसार सांभाळ दिवसभरातून दररोज तास दोन तास अभ्यास ही तिने केला त्यामुळेच तिला यश मिळाले आहे. तिला 10 वीला 75 .20 % गुण मिळवले होते. त्यानंतर तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. पण लग्नानंतर शिक्षण थांबले.
 

दहावीनंतर लग्न लग्नानंतर शिक्षणातील खंड हा रुग्णांचा प्रवास तिचा परीक्षा होईल तोपर्यंत संपला नव्हता, परीक्षेच्या आदल्या रात्री तिच्या बहिणीचा मुलगा दुर्दैवानं मृत्युमुखी पडला असतानाही तिने दुःखाने खचून न जाता धैर्याने परीक्षा सामोरे जात यश मिळवले. तिच्या या यशाबद्दल कुंटुबीय,नातेवाईक, महाविद्यालयात कौतुक होत आहे.


संसार सांभाळत ज्योती'ने मिळवले 79.00 %
Total Views: 121