विशेष बातम्या
के. डी. पाटील सर यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड...
By nisha patil - 8/23/2025 4:28:30 PM
Share This News:
के. डी. पाटील सर यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड...
इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड
गोकुळ शिरगाव येथील सौ. अंबाबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड सायन्स कॉलेज चे संस्थापक प्राचार्य के. डी. पाटील यांची इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. उचगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस राज्य संस्था अध्यक्ष महेश पोळ, गणेश नाईकवडी, मोहन माने, प्रकाश बोटे, प्रकाश पाटील, सुकुमार संकपाळ, बी. एम. हेरवाडे, डॉ. संदेश कचरे, महेश विल्सन, सचिन नाईक, नंदकुमार पवार, बाळासाहेब राऊत, सागर जाधव, दत्तात्रय रणदिवे, अमरदीप पाटील आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
के. डी. पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. पाटील सरांनी इंग्लिश मीडियम शाळांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नेहमीच भरीव काम केले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील इंग्लिश मीडियम शाळांना नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या निवडीनंतर शिक्षक, शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी तसेच विद्यार्थ्यांकडून पाटील सरांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यकाळात इंग्लिश मीडियम शाळांच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
के. डी. पाटील सर यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड...
|