राजकीय
गोकुळ शिरगावमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी के. डी. पाटील यांचे नाव चर्चेत
By nisha patil - 10/17/2025 4:06:30 PM
Share This News:
गोकुळ शिरगावमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी के. डी. पाटील यांचे नाव चर्चेत
गोकुळ शिरगाव पुरुष खुल्या विभागासाठी आरक्षित
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील गोकुळ शिरगाव भागातील जिल्हा परिषद मतदार संघ पुरुष खुल्या विभागासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या आरक्षणानंतर काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीसाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सध्या शशिकांत खोत, के.डी. पाटील, सागर पाटील, सुदर्शन खोत आणि निशांत पाटील यांची नावं चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे, के. डी. पाटील हे २५ वर्षांपासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून अंबूबाई पाटील इंग्लिश स्कूल, गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक योगदानामुळे स्थानिक समाजात त्यांची चांगली ओळख आहे. सामाजिक कार्यामुळे जनतेकडून मिळालेला प्रतिसाद पाहता, काँग्रेस पक्षात त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर शशिकांत खोत यांसारख्या अनुभवी नेत्यांनंतर नवीन चेहरा पुढे आणण्याची मागणीही जोर धरत आहे.
गोकुळ शिरगावमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी के. डी. पाटील यांचे नाव चर्चेत
|