बातम्या
सांगाव येथे के.डी.सी.सी. बँक व नाबार्डतर्फे ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न
By nisha patil - 11/24/2026 11:18:00 PM
Share This News:
सांगाव येथे के.डी.सी.सी. बँक व नाबार्डतर्फे ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न
कागल प्रतिनिधी : अजित बोडक कागल : के.डी.सी.सी. बँक व नाबार्ड यांचे वतीने आर्थिक व डिजीटल साक्षरता जागृती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज मौजे सांगाव येथे ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोकुळचे माजी संचालक मा. श्री. युवराज बापू हे अध्यक्षस्थानी होते. तसेच के.डी.सी.सी. बँकेचे संचालक मा. प्रताप उर्फ भैय्या बाबा माने यांनी बँकेच्या सर्व ठेव योजना, नवनवीन शेती व बिगर शेती कर्ज धोरण व डिजीटल बँक व्यवहार यावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती देताना डिजीटल व्यवहार सुरक्षितपणे कसे करावेत, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी के.डी.सी.सी. बँकेचे शेती कर्ज व्यवस्थापक मा. गिरीश पाटील, उपव्यवस्थापक मा. पी. वाय. कुंभार, व्यक्तीगत कर्ज विभाग व्यवस्थापक मा. अविनाश पाटील, नाबार्डचे को-ऑप इंटर्न मा. दिग्विजय कोकाटे, कागल विभागीय अधिकारी मा. आर. बी. पिष्टे, निरीक्षक मा. एस. के. खोत, शाखाधिकारी श्री. सुधीर जाधव, श्री. संजय कोरवी तसेच मौजे सांगाव, क. सांगाव, सुळकुड व रणदेवीवाडी गावातील सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सचिव तसेच सर्व कर्मचारी व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व आभार कागलचे एफ.एल.सी. प्रमुख मा. सुखदेव मेथे यांनी मानले.
सांगाव येथे के.डी.सी.सी. बँक व नाबार्डतर्फे ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न
|