ताज्या बातम्या
केडीसीसी बँकेकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर २१ कोटींच्या ठेवी जमा
By nisha patil - 3/10/2025 11:28:18 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. २:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध ठेव योजनांमध्ये २१ कोटी ठेवी जमा झाल्या. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बँकेच्या सर्वच ठेव योजनांना ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेने गुरूवारी दि. २ रोजी दसऱ्या दिवशीही ठेवी स्वीकारण्यासाठी बँकेच्या केंद्र कार्यालयासह सर्व म्हणजे १९१ शाखा सुरू ठेवल्या होत्या. बँकेकडे सुरू असलेल्या सर्वच ठेव योजनांना चांगल्या व्याजदरामुळे ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्दिष्ट रु. १२ हजार कोटी ठेवींचे...! केडीसीसी बँकेने दि. ३१ मार्च २०२५ अखेर रू. १०, ६३५ कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे रू. १२, ००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे.
केडीसीसी बँकेकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर २१ कोटींच्या ठेवी जमा
|