बातम्या
कोल्हापूर महापालिका निवडणूक तयारीला वेग : २० विषयांसाठी पथकांची नियुक्ती
By nisha patil - 10/11/2025 5:16:49 PM
Share This News:
कोल्हापूर महापालिका निवडणूक तयारीला वेग : २० विषयांसाठी पथकांची नियुक्ती
कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरील कामकाज अधिक सुरळीत व नियोजनबद्ध करण्यासाठी विविध २० विषयांसाठी नियंत्रण अधिकाऱ्यांसह पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये दोन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच मुख्य लेखापरीक्षक यांच्यावर नियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सध्या मतदार यादींचा कार्यक्रम सुरू असून, या आठवड्यात प्रभाग आरक्षण जाहीर होणार आहे. या दोन टप्प्यांनंतर निवडणुकीची प्राथमिक तयारी पूर्ण होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील, त्यानंतर मुख्य निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत बीएलओची नियुक्ती पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात निवडणुकीचे कामकाज हाताळण्यासाठी कर्मचारी नेमले जाणार आहेत. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नियंत्रण अधिकारी, नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी तसेच विविध विषयांसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे.
या पथकांमध्ये मतदार जनजागृती अभियान, मतदान केंद्र सुसज्ज करणे, कर्मचारी नियुक्ती, ईव्हीएम व स्ट्रॉंगरूम व्यवस्थापन, निवडणूक साहित्य वाटप, प्रशिक्षण व्यवस्थापन, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व सुविधा व्यवस्था, प्रचार परवानगी, संगणकीकरण, सीसीटीव्ही नियंत्रण, निवडणूक निरीक्षक दौरा, मदत केंद्र, तक्रार निवारण, पोस्टल मतदान, न्यायालयीन प्रकरणे आणि उमेदवार खर्च व्यवस्थापन यांसारखे विभाग समाविष्ट आहेत.
या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे
कोल्हापूर महापालिका निवडणूक तयारीला वेग : २० विषयांसाठी पथकांची नियुक्ती
|