बातम्या
के.एम.टी. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय; आमदार क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
By nisha patil - 9/8/2025 1:04:08 PM
Share This News:
के.एम.टी. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय; आमदार क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर, दि. 07 – कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील (KMT) चालक/वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीतील पात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
गेल्या 30–35 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 156 रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या समस्येवर सातत्याने पाठपुरावा करून अखेर कायम करण्याचा निर्णय मिळवण्यात आमदार क्षीरसागर यांना यश आले. यापूर्वी त्यांच्या प्रयत्नांमुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील 508 रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले होते.
आमदार क्षीरसागर यांनी सांगितले की, “गेली अनेक वर्षे सेवा करूनही कायम न होण्याची खंत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे ही माणुसकीची जबाबदारी होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा निर्णय शक्य झाला.”
निर्णयाची माहिती मिळताच KMT कर्मचाऱ्यांनी आमदार क्षीरसागर यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली आणि शिवालय शिवसेना कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
के.एम.टी. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय; आमदार क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
|