बातम्या

"केएमटी कर्मचाऱ्याचा कार्यालय प्रवेशद्वारातच गळफासाचा प्रयत्न"

KMT employee attempts to hang


By Administrator - 7/7/2026 1:57:38 PM
Share This News:



"केएमटी कर्मचाऱ्याचा कार्यालय प्रवेशद्वारातच गळफासाचा प्रयत्न"

कागल प्रतिनिधी अजित बोडके वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करूनही कायम सेवेत समावेश न केल्याने संतप्त झालेल्या केएमटीचे वाहक बाबुराव पाटील यांनी सोमवारी (दि. ६) पहाटे ५.३० च्या सुमारास शाहू क्लॉथ मार्केट येथील केएमटीच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारात गळफास घेण्याचा प्रयत्न. करत आंदोलन केले. या धक्कादायक प्रकारामुळे केएमटी प्रशासनात खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. प्रशासनाने दिलेल्या चर्चेच्या आश्वासनानंतर तब्बल अडीच तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

उपायुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक विजय खाडे, केएमटीचे वाहतूक निरीक्षक संतोष शिंगारे, नितीन पोवार, प्रमोद पाटील, सचिन जाधव आणि संजू भास्कर यांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायम सेवेबाबत ठोस निर्णय

केएमटी बससेवेवर आंदोलनाचा परिणाम

आंदोलनाचा थेट परिणाम केएमटीच्या बससेवेवर झाला. पहाटे ड्युटीवाटपाची प्रक्रिया ठप्प झाल्याने सुमारे अडीच तास बससेवा विस्कळीत राहिली. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, नगरसेवक खाडे आणि उपायुक्त कंकाळ घटनास्थळी यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याशी दूरध्वनीवरून बाबुराव पाटील यांचा संवाद घडवून आणला. आयुक्तांनी १३ जुलै रोजी दुपारी बैठक घेऊन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाटील यांनी गळफास काढून आंदोलन स्थगित केले.

 


"केएमटी कर्मचाऱ्याचा कार्यालय प्रवेशद्वारातच गळफासाचा प्रयत्न"
Total Views: 17