विशेष बातम्या
के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती
By nisha patil - 12/8/2025 2:51:32 PM
Share This News:
के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील कर्मचारी गेले अनेक वर्षे ७ व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी पासून वंचित होते. याबाबत सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला असून, हा प्रश्न मार्गी लागला आहे. के.एम.टी. कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गेले अनेक वर्षे के.एम.टी. कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. सन २०१९ पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्याना ७ वा वेतन आयोग फरकासह लागू झालेला आहे. परंतु, के.एम.टी. कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी झाला के.एम.टी. कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, के.एम.टी.कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाला जाणवून दिल्या. याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांचे भावी आयुष्य सुधरावे, त्यांना न्याय मिळावा, इतक्यावर्ष केलेल्या सेवेचे फलित व्हावे म्हणून हा निर्णय घेतला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे जीवनमान निश्चितच सुधारणार असून, घेतलेल्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीचे आभार मानल असल्याचेही त्यांनी या पत्रकात म्हंटले आहे. .
के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती
|