बातम्या
"केपी पाटील यांच्या घरवापसीने हत्तीचं बळ मिळालं – हसन मुश्रीफांचा विश्वास"
By nisha patil - 5/23/2025 3:43:19 PM
Share This News:
"केपी पाटील यांच्या घरवापसीने हत्तीचं बळ मिळालं – हसन मुश्रीफांचा विश्वास"
शिवसेना (ठाकरे गट) सोडून केपी पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यांच्या स्वागतासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी “हत्तीचं बळ मिळालं” अशी प्रतिक्रिया दिली. राधानगरी-भुदरगड मतदारसंघात यामुळे पक्षाची ताकद वाढेल, असे त्यांनी सांगितले.
केपी आणि एवाई पाटील यांच्यातील वाद मिटवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी स्वतंत्र लढवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
"केपी पाटील यांच्या घरवापसीने हत्तीचं बळ मिळालं – हसन मुश्रीफांचा विश्वास"
|