बातम्या
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजीत विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी
By nisha patil - 8/20/2025 2:49:12 PM
Share This News:
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजीत विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी
कोल्हापूर, दि. 20 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी हे भौतिक व मूलभूत सुविधांनी सुसज्ज असे नवे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष जून 2025-26 पासून सुरू झाले आहे.
या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया CET सेल मार्फत सुरू असून,
-
B.A. LL.B. (५ वर्षे अभ्यासक्रम) साठी प्रवेश प्रक्रिया २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२५ दरम्यान,
-
तर LL.B. (३ वर्षे अभ्यासक्रम) साठी २४ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही किंवा ज्यांना आपल्या पसंतीनुसार महाविद्यालय मिळालेले नाही, अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयात विशेष नोंदणी व विद्यार्थी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
“CET दिलेल्या आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील दिनांकास महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी,” असे आवाहन दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. चंद्राणी बागडी यांनी केले आहे.
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजीत विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी
|