बातम्या

कागल तालुक्यातील शेती पाणी उपसा बंदी रद्द करा..

Kagal 1


By nisha patil - 6/19/2026 11:51:39 AM
Share This News:



कागल तालुक्यातील शेती पाणी उपसा बंदी रद्द करा..

अन्यथा कागल काँग्रेस मार्फत तीव्र आंदोलन...

वार्ताहर:- अजित बोडके कागल तालुक्यातील चिकोत्रा, दूधगंगा ,वेदगंगा नद्यांच्या वरील शेती सिंचन उपसा बंदी रद्द करून महावितरण कडून तात्काळ शेती उपसा पंपासाठी विज पुन:जोडणी करून तालुक्यातील शेती सिंचन पाणीपुरवठा सुरळीत करावा.

याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास कागल तालुका काँग्रेस पक्षामार्फत शेतकऱ्याचे तीव्र आंदोलन करण्याचा बाबतचे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड दयानंद ना. पाटील - नंद्याळकर, सरचिटणीस राहुल घराळ यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता (दक्षिण) डी डी शिंदे यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रती खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ( उत्तर) ज्योती देवकर यांना दिले आहेत.

         निवेदनात म्हटले आहे की,कागल तालुक्यातील शेती सिंचनाकरता दूधगंगा वेदगंगा चिकोत्रा या नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारे मधून पाणीपुरवठा होत आहे. सध्या जून महिन्यात मान्सून पावसाने ओढ दिल्याने कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याच्या प्रमाणात 31 ऑगस्ट पर्यंत पिण्याचे पाण्याची नियोजन करून शेती सिंचनासाठी शेवटचे आवर्तन देण्याची नियोजन केले असताना अचानक शासन स्तरावरून शेतीसाठी पाणी उपसा बंदी आदेश लागू केला आहे.

        सध्या ऊस पिक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. तसेच शेतकऱ्यांनी वळीव पावसाच्या ओलीवर सोयाबीन ,भात पिके पेरणी केलेली आहेत. त्यामुळे ऊसपिक व पेरणीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणीचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत येणार आहेत. उसाचे पीक वाढीवर अनिष्ट परिणाम तसेच पेरणी वाया जाण्याची फार मोठी भीती आहे.

       कागल तालुक्यातील चिकोत्रा, दूधगंगा ,वेदगंगा नद्यांच्या वरील शेती सिंचन उपसा बंदी रद्द करून महावितरण कडून तात्काळ शेती उपसा पंपासाठी विज पुन:जोडणी करून शेती सिंचन पाणीपुरवठा सुरळीत करणे बाबत विनंती केली आहे. 

       . निवेदनावर किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर, ईगल तथा चित्रगुप्त प्रभावळकर , रणजीत खतकर, अमर चौगुले, राजेंद्र शिंदे , रणजीत पाटील ,दीपक शेणवी, सुशांत पाटील, लक्ष्मण माळी, प्रकाश सावंत, अनिल संपकाळ, बाबुराव पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


कागल तालुक्यातील शेती पाणी उपसा बंदी रद्द करा..
Total Views: 11