बातम्या
महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कागल नगरपालिका हादरली! मृतदेहासह नातेवाईकांचा ठिय्या
By nisha patil - 9/17/2026 9:50:02 AM
Share This News:
महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कागल नगरपालिका हादरली! मृतदेहासह नातेवाईकांचा ठिय्या
प्रतिनिधी आझर तहसीलदार कागल : कागल नगरपालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. नगरपालिका प्रशासनाकडून एसआय इन्शुरन्स आणि वैद्यकीय सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करत, वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईकांनी मृतदेह नगरपालिकेच्या दारात आणला आणि प्रशासनाला जाब विचारत ठिय्या आंदोलन सुरू केले. महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी करण्यात आली.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरपालिकेसमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तारा न्यूज साठी प्रतिनिधी अझर तहसीलदार
महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कागल नगरपालिका हादरली! मृतदेहासह नातेवाईकांचा ठिय्या
|