राजकीय

कागल नगरपरिषद निवडणुकीला रंग; एका दिवसात ५१ उमेदवारी अर्ज दाखल

Kagal Municipal Council elections in full swing


By nisha patil - 11/15/2025 10:55:20 AM
Share This News:



कागल :- कागल नगरपरिषद निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने उत्साह पाहायला मिळू लागला आहे. अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ५१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला. आतापर्यंत एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज
शिवसेना (शिंदे गट)तर्फे युगंधरा महेश घाटगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या गटातील ही अधिकृत उमेदवारी असल्याचे समजते.

नगरसेवक पदासाठी वाढती स्पर्धा
नगरसेवक पदाकरिता आजपर्यंत ५० अर्ज दाखल झाले असून, सोमवारीपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षनिहाय अर्ज दाखल विवरण असे –
    •    शिवसेना शिंदे गट – २३ उमेदवार
    •    भारतीय जनता पार्टी – ६ उमेदवार
    •    शिवसेना (उबाठा गट) – ३ उमेदवार
    •    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – अनेक इच्छुक कार्यकर्त्यांचे अर्ज

अर्ज दाखल करण्यासाठी काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह हजेरी लावली, तर काहींनी अल्प कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शांततेत आपले अर्ज भरले.

निवडणूक प्रक्रिया सुयोग्यरित्या सुरू
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अमरदीप वाकडे, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अजय पाटणकर काम पाहत आहेत.


कागल नगरपरिषद निवडणुकीला रंग; एका दिवसात ५१ उमेदवारी अर्ज दाखल
Total Views: 34