राजकीय
कागल तालुका पंचायत समितीचे आरक्षण जाहीर!
By Administrator - 10/13/2025 5:04:26 PM
Share This News:
कागल तालुका पंचायत समितीचे आरक्षण जाहीर!
सभापती पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव
कागल : पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील गट व आरक्षणाची यादी जाहीर झाली असून, यंदाच्या आरक्षणात महिला उमेदवारांना मोठे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
सभापतीपद ‘ओबीसी महिला प्रवर्गासाठी’ राखीव ठेवण्यात आले आहे. तर तालुक्यातील विविध गटांमध्ये सर्वसाधारण, ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गांचे संतुलित प्रतिनिधित्व दिसून येत आहे.
सांगाव गट अनु. जाती प्रवर्गासाठी, सिद्धनेर्ली आणि म्हाकवे हे गट सर्वसाधारण महिला प्रवर्गात, चिखली आणि कापशी हे ओबीसी महिला प्रवर्गात राखीव झाले आहेत. तर मादयाळ गट ओबीसी पुरुषांसाठी राखीव आहे.
या आरक्षणामुळे महिला उमेदवारांना मोठी संधी मिळाल्याचे दिसून येत असून, कागल तालुक्यातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
कागल तालुका पंचायत समितीचे आरक्षण जाहीर!
|