शैक्षणिक

‘कागल-विवेकानंद कॉलेज–कागल’ बससेवा सुरू

Kagal Vivekanand College Kagal bus service started


By nisha patil - 8/13/2025 3:08:14 PM
Share This News:



‘कागल-विवेकानंद कॉलेज–कागल’ बससेवा सुरू

 विवेकानंद कॉलेजमध्ये ‘कागल-विवेकानंद कॉलेज–कागल’ बससेवेचे उद्घाटन

 कोल्हापूर दि. 13:  येथील विवेकानंद कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य्‍ परिवहन महामार्ग व कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभाग यांच्या सहकार्याने ‘कागल-विवेकानंद कॉलेज–कागल’  या मार्गावर नवीन बससेवेचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली, संस्थेचे सी.ई.ओ. मा.कौस्तुभ गावडे यांच्या शुभहस्ते आणि कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाचे उपायुक्त्‍‍ मा.परितोष कंकाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न्‍ झाले.  यावेळी वाहतूक निरीक्षक नितीन पवार, महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी.समन्वयक प्रा.डॉ.श्रुती जोशी, अपघात प्रमुख संतोष शिंगारे, वाहक ए व्ही सातपूते व चालक  पी डी सातपूते हे उपस्थित होते.

या बससेवेच्या उदघाटन प्रसंगी मा.कौस्तुभ गावडे यांनी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वाहतूकीची सोय असणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन संस्था, विवेकानंद कॉलेज आणि प्रा.डॉ.सिध्दार्थ घोडेराव यांनी सदर बससेवेचा सतत मंत्रालयात पाठपुरावा करुन ही बससेवा मंजूर करुन आणली आहे.  सदर बससेवा ही कागल, उजळाईवाडी, उचगाव, कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, अजिंक्यतारा चौक, विवेकानंद कॉलेज, शुगर मिल मार्गे रंकाळा असा मार्गक्रमण करणार असून या भागातील विद्यार्थ्यांनी सदर बससेवेचा लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सिध्दार्थ घोडेराव यानी मानले.  यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.


‘कागल-विवेकानंद कॉलेज–कागल’ बससेवा सुरू
Total Views: 310