बातम्या
कागल-निढोरी रोडवरील नादुरुस्त स्मशानभूमीत भानामतीचा संशय; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By nisha patil - 12/18/2025 12:16:00 PM
Share This News:
कागल-निढोरी रोडवरील नादुरुस्त स्मशानभूमीत भानामतीचा संशय; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कागल प्रतिनिधी स्वप्नील गोरंबेकर – कागल-निढोरी रोड जवळील नादुरुस्त स्मशानभूमीत आज सकाळी भानामतीचा प्रकार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मातीच्या मडक्यावर लाल कपडे बांधून त्यावर हळदी-कुंकू व पूजा केल्याचे, तसेच बाजूला मोठ्या प्रमाणात लिंबू व इतर साहित्य ठेवलेले असल्याचे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आले.
नागरिकांनी घाबरू नये म्हणून तेथील सर्व साहित्य इतरत्र नेऊन टाकण्यात आले. मात्र अशा प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर स्मशानभूमी अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने येथे अंत्यसंस्कार होत नसल्याचा गैरफायदा घेत अशा अंधश्रद्धेचे प्रकार होत असल्याची नागरिकांची भावना आहे. यावर वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.
कागल-निढोरी रोडवरील नादुरुस्त स्मशानभूमीत भानामतीचा संशय; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
|