बातम्या

कागलच्या ग्रामीण रुग्णालयात कागल तालुका आरोग्य आढावा बैठक संपन्न

Kagal taluka


By nisha patil - 6/15/2026 8:06:28 PM
Share This News:



*गोरगरिबांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही म्हणुन ते सरकारी दवाखान्यात येतात याची जाणीव ठेवुन आरोग्य सेवा बजावा*मंत्री हसन मुश्रीफ

कागलच्या ग्रामीण रुग्णालयात कागल तालुका आरोग्य आढावा बैठक संपन्न*

कागल, दि. १५:कागलमध्ये सुरु झालेल्या शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय ग्रामीण रुग्णालयाला जोडले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची शाखा म्हणजे शंभर बेडचा दवाखाना सुरु होत आहे. शासनाच्या माध्यमातून कागल तालुक्यातील सर्व आपले दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रानांही सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कारण; सरकारी दवाखान्यात उपचारासाठी येणारा माणुस हा सर्वसामान्य व गरीब असतो.

तो खाजगी दवाखान्याचा खर्च पेलु शकत नाही. म्हणुन मोठ्या आशेने आपल्याकडे येतो. याची जाणीव ठेवुन आरोग्य विभागातील डाॅक्टर्स, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा बजवावी. असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

         

कागल तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समीतीची आढावा बैठक मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात आशा वर्कर घराघरात फिरुन आरोग्याची माहीती संकलीत करतात. यामुळे प्रत्येक घराचे आरोग्याची स्थिती लक्षात येते. विशेषता गरोदर महिलांची माहिती नोंदविली जाते. नगरपालीका क्षेत्रात आशा वर्कर नसल्याने कागल नगरपालीकेने अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आशा वर्करचे काम करावे. आपण नगरपालीका क्षेत्रातही आशा वर्कर नेमणुकीसाठी प्रयत्न करु. तसेच; आरोग्य विभागातील रिक्त पदे व कर्मचारी भरती बद्दल आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करु, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

         

या वेळी कागलच्या नगराध्यक्षा सविता माने, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, जि. प सदस्या सुवर्णा कांबळे , तहसिलदार अमरदिप वाकडे, मुख्याधिकारी अजय पाटणकर, गट शिक्षण अधिकारी सारीका कासोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सरीता थोरात, डाॅ. सुनंदा गायकवाड, शासकीय होमिओपॅथीक रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. अभिजित आहीरे, मुरगुड रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. प्रविण कानडे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. फारुक देसाई यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा सादर केला. नासीर नाईक यांनी आभार मानले.

         

● नगराध्यक्षा व सभापतीनीं मिटींग घ्यावी.....

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कागलच्या नगराध्यक्षा माने यांना ग्रामीण रुग्णालय व शहरातील आपला दवाखाना याची तर सभापती पाटील यांनी तालुक्यातील आरोग्य केंद्र - उपकेंद्र यांची महिन्याला आढावा बैठक घ्यावी. मी लवकरच मुरगुडच्या नगराध्यक्षांना घेऊन तेथील दवाखान्यात बैठक घेणार आहे.

        

● मंत्री मुश्रीफांनी उपस्थित केले प्रश्न......

या आढावा बैठकीत अधिकारी आढावा सादर करीत असतांना मंत्री मुश्रीफ यांनी त्यांना थांबवुन कागदोपत्री नको प्रॅक्टीकली काय स्थिती आहे ते सांगा, असे सुनावुन डाॅक्टर व कर्मचारी रिक्त पदे, बांधकाम व अपुरी कामे, रोजची रुग्ण संख्या , गरोदर माता व्यवस्थापन, डिलिव्हरी संख्या, सिझरची शस्त्रक्रिया ,डायलेसीस रुग्ण संख्या, उपलब्ध सर्प दंश , श्वान दंश व विविध लसीकरण , साथीचे आजार व उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन, या बद्दल प्रश्न उपस्थित केले.


कागलच्या ग्रामीण रुग्णालयात कागल तालुका आरोग्य आढावा बैठक संपन्न
Total Views: 12