बातम्या
कोल्हापूरातील तरुणाची कागल येथे गळफास घेऊन आत्महत्या
By nisha patil - 10/6/2026 11:17:37 PM
Share This News:
कोल्हापूरातील तरुणाची कागल येथे गळफास घेऊन आत्महत्या
कोल्हापूर- मंगळवार पेठेतील मेडिकल दुकानदाराने कागल येथील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेल्या पिष्टे मळा शेतातील आंब्याच्या झाडाला नॉयलॉन दोरीने गळ्यास गळफास घेऊन आत्महत्या केली.
विशाल हरीष शेळके (वय 29.
रा.262 बी.गजानन महाराज नगर ,संभाजीनगर,कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
हा प्रकार बुधवारी (दि.10) रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आला.
या घटनेची माहिती कागल पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून सदरचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या बाबतची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी कागल पोलिस ठाण्यात दिली होती.
त्याच्या आत्महत्येचे कारण समज शकले नाही.
याचा पुढील तपास कागल पोलिस करीत आहेत.
कोल्हापूरातील तरुणाची कागल येथे गळफास घेऊन आत्महत्या
|