बातम्या

काही काजू व्यावसायिक उद्योजकांचे आपल्या विविध मागण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

Kaju business


By nisha patil - 10/27/2025 11:26:05 AM
Share This News:



काही काजू व्यावसायिक उद्योजकांचे आपल्या विविध मागण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

आजरा(हसन तकीलदार):-तालुक्याचे नगदी पीक आणि पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाचे उत्पादन आपल्या तालुक्यात उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. त्याला पूरक काजू बी प्रक्रिया व्यवसायिकांचे प्रकल्प प्रत्येक गावात सुरु आहेत. या प्रकल्पातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

परंतु या व्यवसायातसुद्धा अनियमितता आणि अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी आपल्या विविध मगण्यांचे निवेदन पालकमंत्री व तहसीलदार यांना काही काजू उद्योजकांनी दिले आहे.

 काही काजू प्रक्रिया उद्योजक एकत्र येत आपल्या समस्येबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, काजू उद्योजकासाठी अन्यायकारक आवश्यक नसताना बाजार समिती परवाना काढणेसाठी बाजार समितीचा तगादा कायमस्वरूपी बंद व्हावा.

ऑनलाईन पोर्टलवर बाजारसामितीचा परवाना नाही शिवाय समितीकडून भरून घेतलेली रक्कम पावती हाच परवाना असे सांगितले जाते. काजू असोसिएशनकडून वेगळी रक्कम रु 1000/-व त्यांचे मार्फत नाही गेले तर वेगळी रक्कम रु. 3000/-हा फरक कशासाठी? सर्वांना समान न्याय मिळावा. परवाना बंधनकारक नाही तर ही वसुली कशासाठी हा प्रश्न आहे. आयात काजूबीच्या गाड्या अडवणूक करून बाजार समिती पैसे वसूल करत आहे. यावर ठोस कार्यवाही नाही. महावितरण कंपनीकडून सोमवार ऐवजी शुक्रवारी वीज खंडित व्हावी. शुक्रवारी बाजारचा दिवस असलेने कामगार कामावर येत नाहीत त्यामुळे सोमवार व शुक्रवार दोन दिवस कारखाने बंद ठेवावे लागतात. परिणामी आर्थिक फटका बसत आहे. छोटे कारखानदार नोंदणीकृत नाहीत ते घरगुती विक्री समजून त्यांना अन्नपरवाना बाबत सूट द्यावी. बॉयलरचे साधे व आय.बी.आर. असे दोन प्रकार आहेत. साधे बॉयलर ऍक्टमधून वगळावे. अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर पांडुरंग जोशीलकर, दशरथ बोलके, महादेव पोवार, युवराज सावंत, इंद्रजित देसाई, युवराज पाटील, संजय माने, शिवाजी गोडसे, वसंत निर्मळे, संगीता कटाळे, शंकर कसलकर, शुभम आजगेकर, पंकज कवळेकर, शिवाजी गुडूळकर आदींच्या सह्या आहेत.


काही काजू व्यावसायिक उद्योजकांचे आपल्या विविध मागण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन
Total Views: 55