विशेष बातम्या
भोने मळा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व गोरोबा काका मंदिराचा कलशारोहण सोहळा; स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती
By nisha patil - 4/26/2025 2:41:06 PM
Share This News:
भोने मळा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व गोरोबा काका मंदिराचा कलशारोहण सोहळा; स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती
भोने मळा, इचलकरंजी येथील श्री संत गोरा कुंभार सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री गोरोबा काका मंदिराचा कलशारोहण व संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या पावन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत गोरोबा काकांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी ह.भ.प. माने महाराज, श्री संत गोरा कुंभार सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुंभार, उपाध्यक्ष संतराम कुंभार, सचिव सुधाकर कुंभार, तसेच मारुती कुंभार, विलास कुंभार, महेश कुंभार, मंगेश कुंभार, प्रकाश कुंभार, विजय कुंभार, विनायक काळे, सुशांत मंडावले यांच्यासह समस्त कुंभार समाज व वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात भक्तिगीते, कीर्तन, प्रवचन व दिंडी सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. हा सोहळा भाविकांसाठी अध्यात्मिक आनंददायक ठरला.
भोने मळा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व गोरोबा काका मंदिराचा कलशारोहण सोहळा; स्वप्निलदादा आवाडे यांची उपस्थिती
|