बातम्या
कळंबा जेल परिसरात गॅस स्फोटमध्ये चौघे जखमी
By nisha patil - 8/26/2025 10:02:55 AM
Share This News:
कळंबा जेल परिसरात गॅस स्फोटमध्ये चौघे जखमी
कोल्हापूर,कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सोमवार रात्री 11 च्या सुमारास घरगुती गॅसमध्ये स्फोट् झाला. यामध्ये दोन लहान मुलांसह चार जण जखमी झाले.
शहरामध्ये थेट गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. नुकताच कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सुद्धा थेट गॅस पाईपल्याने गॅस पुरवठा सुरू आहे. सोमवार रात्री अकरा वाजण्याची सुमारास येथील शितल भोजने यांच्या घरामध्ये गॅसमधून अचानक स्फोट झाला. यामध्ये त्यांच्यासह एक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाले. घरामधील साहित्याची नुकसान झाले आहे. स्फोट झाल्याने खिडक्यांच्या काचाही फुटले आहेत. घरातील बसण्यासाठी असणारा कोच सुद्धा जळाला आहे. याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. स्थानक प्रमुख जयवंत देशमुख यांच्यासह जवान येथे आले. त्यांनी स्थिती नियंत्रण आणली. दरम्यान जखमी चौघांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कळंबा जेल परिसरात गॅस स्फोटमध्ये चौघे जखमी
|