बातम्या
शिवसेना महानगर समन्वयक पदावर कमलाकर जगदाळे यांची नियुक्ती
By nisha patil - 5/21/2025 7:39:44 AM
Share This News:
शिवसेना महानगर समन्वयक पदावर कमलाकर जगदाळे यांची नियुक्ती
मुंबई : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या सहकार्याने शिवसेना कोल्हापूर महानगर समन्वयक पदावर श्री.कमलाकर वसंतराव जगदाळे यांची आज नियुक्ती करण्यात आली.
उप मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात शिवसेनेची भक्कम बांधणी होत आहे. गत विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेने जोरदार तयारी केली असून, संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी आज कमलाकर जगदाळे यांना कोल्हापूर महानगर समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली.
कमलाकर जगदाळे हे कट्टर शिवसैनिक असून, आमदार राजेश क्षीरसागर यांचे खंदे समर्थक आहेत. सन २००६ ते ०९ या कालावधीत त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळली आहे. तत्कालीन भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व सद्याचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कॉलेज तेथे विद्यार्थी सेनेची शाखा स्थापन केल्या. विध्यार्थी, सर्वसामन्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम आमदार राजेश क्षीरसागर यांच्या खांद्याला खांदा लावून केले आहे.
सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी तत्कालीन कॉंग्रेस शासना विरोधात वाढीव घरफाळा, पाणीपट्टी, वीजबिल दरवाढ, महागाई विरोधातील आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवडणुकीतही मोलाचा वाटा त्यांनी उचलला आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती उत्सवात संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी उत्तमरीतीने पार पाडली. राजर्षी शाहू स्पोर्ट्स फुटबॉल क्लब अध्यक्ष, राजारामपुरी ग्राहक शाकाहारी संस्था चेअरमन, छत्रपती कामगार इंडस्ट्रीयल को ऑप हौसिंग सोसायटी सचिव अशा पदांवर ते कार्यरत आहेत.
सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी राजारामपुरी परिसरात नावलौकिक मिळविला असून, संघटनात्मक बांधणीस बळकटी देवून करून शिवसेनेचे प्राबल्य निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
शिवसेना महानगर समन्वयक पदावर कमलाकर जगदाळे यांची नियुक्ती
|