बातम्या
कानोलीत सर्प दंशाने म्हैस व बकऱ्याचा मृत्यू
By nisha patil - 10/3/2026 2:37:53 PM
Share This News:
*कानोलीत सर्प दंशाने म्हैस व बकऱ्याचा मृत्यू**
**पाटील कुटूंबियाचे सव्वा लाखाचे नुकसान*
आजरा हसन तकीलदार ):-कानोली (ता. आजरा ) येथील सौ.माया सतिश पाटील, या महिला शेतकरी कुटुंबातील म्हैस व बकरीला सर्प दंश झाल्याने बकरी व म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दि. 7 मार्च रोजी गोठ्यात अचानकपणे बकरीचा मृत्यू झाला, अचानक घडलेल्या घटनेने पाटील कुटुंबीय भांबाऊन गेले, बकरीचा मृत्यू कशामुळे झाला,याबाबत अनभिज्ञ असतानाच अचानकपणे गोठ्यातील दुभती म्हैस जागेवरच कोसळली. या दोन्ही सलग घटनेने काय करावे सुचेना, पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलावून उपचार केले, मात्र दोन दिवस म्हशीने चारा खाणे दुध देणे बंद केले, तिसऱ्या दिवशी म्हैस उभी राहिली व पाणी प्याली मात्र अचानकपणे तोंडातून फेस येऊन म्हैशीचाही मृत्यू झाला.
दोन्ही पशुधनाच्या जाण्याने पाटील कुटुंबियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,पाटील कुटुंबियांची परिस्थिती हालाखीची असून, पशुधन दगवल्याने कुटुंबियांवार मोठा आघात झाला आहे.निरीक्षण केले असता म्हशीच्या पायाजवळ दंश झाल्याचे निशाण आढळले. त्यामुळे सर्प दंशाने बकरी आणि म्हैस दगावली असल्याचे बोलले जात आहे.
शेवटी शेतातच जेसीबीने खड्डा काढून म्हशीला मातीआड करण्यात आले. एव्हड्या मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर पडणे त्यांना मुश्किलीचे आणि आव्हानात्मक होणार आहे.
कानोलीत सर्प दंशाने म्हैस व बकऱ्याचा मृत्यू
|