बातम्या
कानोलीतील त्या आपत्ती ग्रस्त दुध उत्पादकास आर्थिक मदत
By nisha patil - 1/4/2026 10:21:38 AM
Share This News:
**कानोलीतील त्या आपत्ती ग्रस्त दुध उत्पादकास आर्थिक मदत*
आजरा (हसन तकीलदार)*:-कानोली ता. आजरा येथील दुध उत्पादक सभासद सौ. माया सतिश पाटील यांच्या कुटूंबातील दुभती म्हैस, बकरी आणि कोंबडी गोठ्यात सर्पदंश झाल्याने महिन्याच्या सुरवातीस दगावले होते, त्यामुळे पाटील कुटूबियांचे अंदाजे सव्वा लाखाचे नुकसान झाले होते,
सर्वसामान्य तसेच पशुधनावर आधारित असलेल्या या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या संकटामुळे मोठा पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता.या बाबतची बातमी आमच्या चॅनेलने प्रसिद्ध केली होती.
याची दखल घेऊन गोकुळचे संचालक चेतन अरुण नरके यांनी कानोली येथे कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली, आणि आपल्याकडून व्यक्तिगत स्वरूपात रु. 10 हजाराची आर्थिक मदत देऊन नवीन म्हैस घेण्यासाठी सांगितले आणि गोकुळ कडूनही आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे पाटील कुटुंब भारावून गेले, यावेळी सरपंच सौ. सुषमा पाटील, गजानन दुध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील, संचालक सुभाष पाटील, अनिल पाटील सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, चित्रा पाटील आदिजण उपस्थित उपस्थित होते.
कानोलीतील त्या आपत्ती ग्रस्त दुध उत्पादकास आर्थिक मदत
|