शैक्षणिक
गारगोटीत कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालय कडून नवागतांचे स्वागत
By Administrator - 7/8/2025 4:31:22 PM
Share This News:
गारगोटीत कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालय कडून नवागतांचे स्वागत
भुदरगड - प्रकाश खतकर शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या गारगोटीत कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले यावेळी नवीन प्रवेश घेतलेले विध्यार्थी अगळ्या - वेगळ्या स्वागता मुळे भारावून गेले होते.
कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील इयत्ता अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मौनी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांची फेरी काढून या
नवागतांचे पुष्पवृष्टी करून गुलाबपुष्प व साखर-पेढे वाटून उत्साहात स्वागत करण्यात आले.
प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, उपप्राचार्य डॉ. संजय देसाई, एस. जे. जितकर, पर्यवेक्षक एस. एस. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, कर्मचारी उपस्थित होते. प्रा. डी. एन. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डी. जे. आरडे यांनी आभार मानले. बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन करून यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गारगोटीत कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालय कडून नवागतांचे स्वागत
|