विशेष बातम्या
करुणा शर्माचे मंत्री-माजी मंत्र्यांविरोधात जोरदार आरोप
By nisha patil - 10/18/2025 3:20:31 PM
Share This News:
करुणा शर्माचे मंत्री-माजी मंत्र्यांविरोधात जोरदार आरोप
बीडमध्ये ओबीसी समाजाची महाएल्गार सभा पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. सभेनंतर करुणा शर्माने जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले, “धनंजय मुंडे यांच्याविरोधात मी उभी राहिले, पण अर्ज रद्द झाला. समाजाला न्याय देता येत नाही, ते स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत.”
करुणा शर्माने आपल्या कुटुंबावर झालेल्या घटनेचा उल्लेख करत म्हटले, “माझ्या आईला आत्महत्या करावी लागली, बहिणीवर बलात्कार झाला, माझा ड्रायव्हर मर्डर झाला. जे न्याय मिळाले नाही, तो समाजाला कसा मिळेल?”
शर्माने पुढे आरोप केले की निवडणुकीच्या काळातच समाजाचे प्रश्न पाहिले जातात आणि त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. यामुळे बीडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
करुणा शर्माचे मंत्री-माजी मंत्र्यांविरोधात जोरदार आरोप
|