ताज्या बातम्या
इमारतीला चिटकुन असणाऱ्या ११००० के. व्ही. तारेला ब्रॅकेट लावून तातडीने रस्त्याच्या मध्यभागी घ्या - करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..
By nisha patil - 7/11/2025 2:03:15 PM
Share This News:
उचगांव, ता. करवीर येथील सार्थक वळकुंजे हा १६ वर्षाचा मुलगा ११००० के.व्ही. विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. उचगांव माळ भागातील वस्ती ही दाट लोक वस्ती आहे..
साधारण प्रत्येकाचे ४०० ते ५०० स्क्वे. फुटात छोटी-छोटी लागुन घरे बांधली आहेत व प्रत्येकाने आपल्या मुलांना सोईचे होईल असे १,२ व ३ मजली इमारती राहणेसाठी बांधल्या आहेत. बाबानगर रोडवर ११००० के.व्ही. विद्युत तार त्या भागातून गेली आहे.
साधारण ही हायटेन्शन तार असल्याने ती तार रस्ते छोटे असल्याने मध्यभागी घेणे गरजेचे होते. पण ती तार अगदी इमारतींना घासुन गेली आहे. काल सार्थक वळकुंजे हा १६ वर्षाचा मुलगा पतंग काढत असताना त्या ११००० के.व्ही. विद्युत तारेचा स्पर्श झालेने त्याचा दुर्देव मृत्यू झाला. आतातरी महावितरण जागी होणार आहे का ? का अनेक सार्थक सारख्या मुलांचा जीव गेलेनंतर जागी होणार आहे. अगदी त्याच परिसरातून पुर्वी ३३००० के.व्ही. ची हायटेन्शन तार ही दाट लोकवस्तीतुन गेली होती. त्या तारेलाही ४ ते ५ जण चिटकुन मयत झालेवर त्या तारेमधील विद्युत प्रवाह बंद केला होता हा अनुभव असतानाही विजवितरण इतकी निष्काळजी का वागते ? ११००० के. व्ही. प्रवाह असलेली विद्युत तार ही ब्रकेट टाकून रस्त्याच्या मध्यभागी तातडीने घेणेत यावी ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विजवितरण कार्यालयाला मागणी आहे. तातडीने असे न झालेस उचगांवच्या विज विजरण कार्यालयासमोर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मा. संदिप काकडे सहाय्यक अभियंता विजवितरण कार्यालय, उंचगाव यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी ही घटणा घडली होती त्या ठिकाणी बोलवून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, उंचगाव हे दाट वस्तीचे गाव आहे. व रस्तेही लहान आहेत त्यामुळे जर त्या तारेला ब्रॅकेट लावून मध्यभागी घेतले असते तर ही दुःखद घटना घडली नसती. वीज वितरण चे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुली वेळी कार्य तत्परता दाखवतात तशी कार्यतत्परता अशा घटना घडू नयेत यासाठी दाखवावी. व उजगाव मध्ये इमारतीला चिटकून असलेल्या अशा सर्व विज तारांना ब्रॅकेट लावून तातडीने त्या मध्यभागी घ्याव्यात. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला..
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील चौगुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर, युवासेना माजी तालुकाप्रमुख संतोष चौगुले, गग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे, आबा जाधव, रामराव पाटील, गुरू माने, कृष्णा वळकूंजे, निवास यमगर, संजय गायकवाड आदी शिवसैनिक व घटना घडली त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
इमारतीला चिटकुन असणाऱ्या ११००० के. व्ही. तारेला ब्रॅकेट लावून तातडीने रस्त्याच्या मध्यभागी घ्या - करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..
|