बातम्या

गांधीनगर मेन रोडवर तात्काळ गतिरोधक बसवण्याची करवीर तालुका शिवसेनेची मागणी

Karveer Taluka Shiv Sena demands


By nisha patil - 8/25/2025 3:41:35 PM
Share This News:



गांधीनगर मेन रोडवर तात्काळ गतिरोधक बसवण्याची करवीर तालुका शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : गांधीनगर मेन रोडवरील भरधाव वाहतुकीमुळे अपघात वाढत असून नुकत्याच झालेल्या अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला. त्यामुळे तातडीने आवश्यक ठिकाणी गतिरोधक/रमलर बसवावेत, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हुपरी-कोल्हापूर मेन रोडवरील उचगाव, गडमुडशिंगीसह विविध गावांच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणीही करण्यात आली.

विशेषत: उचगाव आणि तावडे हॉटेल उड्डाणपुलाखालील खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक झाली असून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने आत्मपरीक्षण करावे, असा सवालही करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले असून, स्पीड ब्रेकर व रमलर बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या अहवालानंतर कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.


गांधीनगर मेन रोडवर तात्काळ गतिरोधक बसवण्याची करवीर तालुका शिवसेनेची मागणी
Total Views: 112