शैक्षणिक
करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी महिला व्यायामशाळेचे उद्घाटन
By nisha patil - 12/27/2025 12:37:30 PM
Share This News:
कोल्हापूर :- शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून साने गुरुजी वसाहत येथे महिलांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी महिला व्यायामशाळेचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले.
ही महिला व्यायामशाळा पूर्णतः आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, येथे महिलांसाठी आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये ट्रेडमिल, विविध प्रकारची फिटनेस मशीन, वेट ट्रेनिंगसाठी आवश्यक साहित्य यांचा समावेश आहे.
यासोबतच झुंबा क्लास, स्वतंत्र मसाज रूम, चेंजिंग रूम, स्टीम बाथ तसेच महिलांसोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी विशेष चिल्ड्रन्स रूम उपलब्ध आहे.
महिलांचे आरोग्य, फिटनेस आणि मानसिक सुदृढता यावर विशेष भर देत ही व्यायामशाळा सुरू करण्यात आली असून, सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरणात महिलांना नियमित व्यायाम करण्याची सुविधा मिळणार आहे. परिसरातील महिलांसाठी ही व्यायामशाळा आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी महिला व्यायामशाळेचे उद्घाटन
|