बातम्या
कसबा बावड्याची कन्या सायली भोसले यशाच्या शिखरावर — राज्यसेवा (राजपत्रित वर्ग-1) परीक्षेत उल्लेखनीय यश!
By nisha patil - 10/31/2025 5:55:46 PM
Share This News:
कसबा बावड्याची कन्या सायली भोसले यशाच्या शिखरावर — राज्यसेवा (राजपत्रित वर्ग-1) परीक्षेत उल्लेखनीय यश!
कसबा बावड्याची कन्या सायली रुपाली किरण भोसले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा (राजपत्रित वर्ग-1) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सायली भोसले यांनी मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सायली भोसले तसेच भोसले कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील प्रशासकीय कार्यकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
कसबा बावड्याची कन्या सायली भोसले यशाच्या शिखरावर — राज्यसेवा (राजपत्रित वर्ग-1) परीक्षेत उल्लेखनीय यश!
|