बातम्या
सन 2025-26 मध्ये उत्कृष्ठ शस्त्रक्रिया कामकाजाबद्दल कसबा बावडा येथे सत्कार समारंभ संपन्न
By nisha patil - 10/5/2026 5:13:49 PM
Share This News:
**सन 2025-26 मध्ये उत्कृष्ठ शस्त्रक्रिया कामकाजाबद्दल कसबा बावडा येथे सत्कार समारंभ संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:- दिनांक 08/05/2026 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक अधिनस्त जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र सेवा रुग्णालय कसबा बावडा, कोल्हापूर येथे सन 2025-26 मध्ये जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम शस्त्रक्रिया उत्कृष्ठ कामकाज केलेबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बाल शल्य चिकित्सक डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, सर्जन डॉ. सुनिल कुरुंदवाडे, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. दिलीप वाडकर, सेवा रुग्णालय भूलतज्ञ डॉ. सुश्रुत नाडकर्णी, डॉ. जयंता पाटील, डॉ.महेंद्र कुंभोजकर, शल्य चिकित्सक डॉ.धीरज महाजन तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम पथक क्रमांक-1,पथक क्रमांक-2,पथक क्रमांक-3,जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अधिकारी/कर्मचारी, सर्व ओ टी स्टाफ,आंतररुग्ण विभाग ,एम जे पी जे वाय योजना स्टाफ यांना उपसंचालक डॉ.दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलीमा पाटील यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तावना बालरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब थोरात यांनी केली व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र विभागामध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि उपचार पद्धती यासंदर्भात प्रगतीपर कामकाजाची माहिती दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन व मनोबल वाढविणारे मोलाचे मार्गदर्शन केले. उपसंचालक कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉ.दिलीप माने यांनी उत्कृष्ठ सेवा पुरस्कार हा कार्यक्रम जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामार्फत राबवून एक चांगला उपक्रम कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारा असून असे कार्यक्रम घेतल्याने कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढेल व त्यांना काम करण्यासाठी नवी ऊर्जा येईल.तसेच आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये यासोबतच आपल्याकार्यक्रमाचा,रुग्णालयाचा, आपल्या जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देऊन क्रम सुधारता येईल असे सांगितले व सर्वांना त्यांच्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि सर्वजण असेच चांगले काम सेवा रुग्णालयात करत राहू अशी प्रेरणा दिली.
सदर कार्यक्रम आयोजना करिता डॉ.दिलीप माने( उपसंचालक कोल्हापूर मंडळ कोल्हापूर) , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा पाटील ,सेवा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलीमा पाटील मॅडम,जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे बालरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब थोरात , वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणाजी नलवडे , प्रज्ञा संकपाळ , व्यवस्थापक मनोरमा सुंजी, सेवा रुग्णालयातील सर्व RBSK टीम तसेच सर्व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे अधिकारी,कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपस्थित सर्व मान्यवर व अधिकारी कर्मचारी यांचे आभार जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रविभागाचे दंत शल्य चिकित्सक डॉ.सात्विक कुलकर्णी यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सन 2025-26 मध्ये उत्कृष्ठ शस्त्रक्रिया कामकाजाबद्दल कसबा बावडा येथे सत्कार समारंभ संपन्न
|