विशेष बातम्या
कसबा तारळेत गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
By nisha patil - 7/24/2025 3:36:12 PM
Share This News:
कसबा तारळेत गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
पंचक्रोशीतले यशस्वी मान्यवर सन्मानित – तरुणांना प्रेरणा देणारा सोहळा
कसबा तारळे (ता. राधानगरी)पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील यशस्वी व कार्यक्षम मान्यवरांचा एस. एम. पाटील युवा मंच, कसबा तारळे यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. शिवाजीराव महादेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि निवडक मान्यवरांच्या साक्षीने हा गौरव समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात शैक्षणिक, प्रशासकीय, सहकारी व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. निवड, पदोन्नती, पुरस्कार व सेवानिवृत्तीसारख्या विविध निमित्तांनी गौरविण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये पुढीलंचे समावेश होता:
संकेत देवर्डेकर – पोलीस उपनिरीक्षक (PSI)
सुरेश साबळे – आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त
उत्तम पाटील – भोगावती कामगार सोसायटी अध्यक्ष
आनंदा जाधव, सुनील कांबळे, एम. बी. पाटील – मुख्याध्यापक म्हणून निवड
सुरेश पाटील – गट सचिव पतसंस्थेचे उपाध्यक्ष
सुरज पाटील – कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्थेचे संचालक
सचिन रामसिंग, आनंदा जाधव, अशोक पाटील – सेवानिवृत्त सन्मान
संजय पाटील – कुंभारवाडी उपसरपंच
या गौरवाने पंचक्रोशीतील तरुणांना प्रेरणा मिळेल, तर सन्मानित व्यक्तींच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले.
कसबा तारळेत गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
|