बातम्या
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांची सोलापूरमध्ये दमदार मोर्चेबांधणी!
By nisha patil - 10/16/2026 11:36:21 PM
Share This News:
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांची सोलापूरमध्ये दमदार मोर्चेबांधणी!
माळशिरसमधील भाजपा-महायुतीच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित
माळशिरस, सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रचाराला गती दिली आहे. माळशिरस येथे आयोजित भाजपा-महायुतीच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक, पदवीधर बंधू-भगिनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी केली. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने महायुतीची एकजूट आणि समन्वयाचे चित्र या सभेतून समोर आले.
माळशिरस येथील या प्रचारसभेला माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, रावेरचे आमदार अमोल जावळे, माजी शिक्षक आमदार भगवान (आप्पा) साळुंखे, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते सोपानकाका नारनवर, भाजपा वरिष्ठ नेते अमरसिंह माने देशमुख, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष शरद मदने, अकलूज मंडळ अध्यक्ष सुजयभैय्या माने पाटील, माळशिरस मंडळ अध्यक्ष नितीन मोहिते, पिलीव मंडळ अध्यक्ष संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, नातेपुतेचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, भाजपा पदाधिकारी सचिन शिंदे, शिवसेना नेते राजकुमार हिवरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर ग्रामीण अध्यक्ष अक्षय भांड, धनगर कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हनुमंतराव सूल, पंचायत समिती सदस्य राहुल रुपनवर, आनंद शेंडगे आणि नम्रता शिवराज पोकळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक-पदवीधर उपस्थित होते.
प्रचारसभेबरोबरच कौस्तुभ गावडे यांनी माळशिरस येथील शैक्षणिक संस्थांनाही भेट देत शिक्षकांशी थेट संवाद साधला. श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था संचलित गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय तसेच मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विभाग येथे त्यांनी भेट दिली. या वेळी शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, शिक्षकांसमोरील विविध आव्हाने, प्रलंबित प्रश्न आणि शिक्षकांच्या अपेक्षा यांवर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान संस्थेचे संचालक संतोष पांडुरंग कुलकर्णी, प्राचार्य सूर्यकांत सिद्राम जानकर, पर्यवेक्षक हनुमंत रंगराव बाबर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कांबळे मॅडम आणि ॲड. शरद मदने उपस्थित होते. शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षणव्यवस्थेच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्याच्या दृष्टीने कौस्तुभ गावडे यांनी संस्थाभेटी आणि जनसंवादावर भर दिला. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका या संवादातून अधोरेखित झाली.
माळशिरसमधील प्रचारसभा, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक संस्थांमधील संवाद यांमुळे कौस्तुभ गावडे यांच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रचारदौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले. शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यावर या दौऱ्यात विशेष भर देण्यात आला.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांची सोलापूरमध्ये दमदार मोर्चेबांधणी!
|