बातम्या
इस्लामपुरात कौस्तुभ गावडेंची शैक्षणिक मान्यवरांशी भेट; शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा!
By nisha patil - 10/13/2026 3:00:39 PM
Share This News:
इस्लामपुरात कौस्तुभ गावडेंची शैक्षणिक मान्यवरांशी भेट; शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा!
आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौस्तुभ गावडे यांनी इस्लामपूर येथील सौ. कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत शिक्षकांचे विविध प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि आगामी निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
या भेटीदरम्यान प्रा. डॉ. टी. जे. शिंदे, प्रा. डॉ. रमेश पाटील, प्रा. डॉ. राम नाईक, प्रा. डॉ. आर. के. माने, प्रा. डॉ. सर्जेराव गायकवाड, प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. डॉ. तेजस्विनी डांगे-पाटील आणि प्रा. डॉ. उज्वला पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या या चर्चेत शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न आणि शिक्षकांच्या अपेक्षांवर विचारांची देवाणघेवाण झाली. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. या सदिच्छा भेटीच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधत शिक्षकांच्या प्रश्नांना जाणून घेण्यावर भर दिला.
इस्लामपुरात कौस्तुभ गावडेंची शैक्षणिक मान्यवरांशी भेट; शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा!
|