राजकीय

कौस्तुभ गावडेंच्या प्रचाराचा कुर्डूवाडी-माढ्यात झंझावात! बबनदादा-संजयमामांचा जाहीर पाठिंबा!

Kaustubh Gawades campaign takes Kurduwadi


By nisha patil - 10/14/2026 9:42:11 AM
Share This News:



कौस्तुभ गावडेंच्या प्रचाराचा कुर्डूवाडी-माढ्यात झंझावात! बबनदादा-संजयमामांचा जाहीर पाठिंबा!

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने कुर्डूवाडी-माढा परिसरात जोर धरला आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी गावडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रचाराला बळ मिळाले आहे. कौस्तुभ गावडे यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देत शिक्षकांशी थेट संवाद साधला. शिक्षकांच्या समस्या, सेवाविषयक अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जिव्हाळा सुसंस्कार मंदिर, आंतरभारती विद्यालय, नूतन विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, महात्मा ज्योतिबा फुले ज्युनिअर कॉलेज यांसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला. जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, सेवासुरक्षा, प्राध्यापकांच्या मानधनवाढीचा विषय आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे, या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

या प्रचारात सोलापूर जिल्हा निवडणूक प्रचारप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित करत, कुर्डूवाडी-माढा परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे.


कौस्तुभ गावडेंच्या प्रचाराचा कुर्डूवाडी-माढ्यात झंझावात! बबनदादा-संजयमामांचा जाहीर पाठिंबा!
Total Views: 15