राजकीय
बापूजींच्या सुसंस्काराची पोच पावती हाच ...कौस्तुभ गावडेंचा विजय
By nisha patil - 10/28/2026 1:58:53 PM
Share This News:
बापूजींच्या सुसंस्काराची पोच पावती हाच ...कौस्तुभ गावडेंचा विजय
शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी प्रज्वलित केलेल्या ज्ञान यज्ञातून हजारो विद्यार्थी आणि गुरुदेव कार्यकर्ते घडले.आज महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात गेल्यास या ज्ञान यज्ञात तयार झालेले विद्यार्थी आणि शिक्षक दिसतात. "ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार" या बापूजींनी घालून दिलेल्या ब्रीद वाक्याच्या आधारे वाटचाल करीत आहे.
बापूजींच्या विचारांचा वारसा आता महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत शिक्षक आमदाराच्या रूपाने कौस्तुभ गावडे पोहचले आहेत.खऱ्या अर्थाने सुसंस्कार लाभलेली आणि शिक्षकांचे,विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणारी व्यक्ती शिक्षक आमदार म्हणून पोहचल्याने सर्वच शिक्षकांना आनंदित होणार यात शंका नाही.गेली महिनाभर संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, संस्थेचे पदाधिकारी, अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांनी आणि संस्थेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले. त्यामुळेच हा विजय सोपा झाला असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरणार नाही.
एक युवा चेहरा शिक्षक मतदार संघाला मिळाला आहे.शिक्षण क्षेत्राचे बाळकडू त्यांना लहान वयातच मिळाले आहे.सर्व प्रश्नांची त्यांना जाण असल्यामुळे ते शिक्षण क्षेत्र अधिक तेजस्वी आणि दैदिप्यमान करतील अशी अपेक्षा आहे.
विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा.
बापूजींच्या सुसंस्काराची पोच पावती हाच ...कौस्तुभ गावडेंचा विजय
|