बातम्या

के.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ९०%

KdCBank


By nisha patil - 1/7/2025 10:23:26 PM
Share This News:



के.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ९०%

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४-२५ हंगामात २.६० लाख शेतकऱ्यांना ₹२५८७ कोटींचे पीक कर्ज वितरित केले होते. त्यापैकी ३० जून २०२५ अखेर ₹२३३२ कोटी कर्जाची वसुली होऊन वसुलीचे प्रमाण ९०.१४% झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण पतपुरवठ्यात के.डी.सी.सी. बँकेचा ८०% वाटा आहे. वसुलीच्या कामगिरीसाठी शेतकरी, संस्था, बाजार समित्या, कारखाने व सहकार विभागाचे सहकार्य लाभले, अशी माहिती सीईओ जी. एम. शिंदे यांनी दिली.

अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कर्जमाफीच्या अफवांमुळे काही वसुली थांबल्याचे सांगत, "प्रामाणिक शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा," असे स्पष्ट केले.


के.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ९०%
Total Views: 112