बातम्या

केडीसीसी बँकेत बदलते समीकरण! 

Kdcc bank


By nisha patil - 7/24/2025 3:32:58 PM
Share This News:



केडीसीसी बँकेत बदलते समीकरण! 

अध्यक्षपदी ए. वाय. पाटील यांचं नाव चर्चेत

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही सहकार संस्था पदांवरून राजीनाम्याचा विचार सुरु केला आहे. संचालकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर के डी सी सी बँकेचे ज्येष्ठ संचालक(ए. वाय.) पाटील यांचे नाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. ए. वाय. पाटील हे बँकेचे माजी अध्यक्ष असून, सहकारात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं आजरा, राधानगरी, भुदरगड आणि कागल या भागात मजबूत आहे.माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील हे मेव्हणे पाहुणे असून, त्यांच्या राजकीय तणावाला विराम देत राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यात सतेज (बंटी) पाटील व विनय कोरे यांची भूमिकाही निर्णायक ठरणार असून हसन मुश्रीफ काय बोलतात आणि प्रत्यक्षात काय करतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.


केडीसीसी बँकेत बदलते समीकरण! 
Total Views: 69