बातम्या

विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण अनिवार्य – केडीसीसी बँकेचे निर्देश

Kdcc bank1


By nisha patil - 7/24/2025 9:18:51 PM
Share This News:



विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण अनिवार्य – केडीसीसी बँकेचे निर्देश

कोल्हापूर, दि. २४ : प्राथमिक विकास सेवा संस्थांचे दैनंदिन कामकाज संगणक प्रणालीवर अद्ययावत ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिली.

संगणकीकरणाअभावी कोणतेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.कोल्हापूर जिल्ह्यातील १७५१ संस्था प्रकल्पासाठी पात्र ठरल्या असून, १७५० संस्थांना संगणक व आवश्यक हार्डवेअर देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या २५१६ कोटींच्या योजनेअंतर्गत पाच वर्षांत देशातील ६३ हजार संस्था संगणकीकृत केल्या जाणार आहेत.

या उपक्रमामुळे संस्थांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता वाढून शेतकऱ्यांना कर्ज वितरण, योजना लाभ, व्यवहार सुलभ होतील, असे शिंदे यांनी सांगितले.

 


विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण अनिवार्य – केडीसीसी बँकेचे निर्देश
Total Views: 86