बातम्या
केडीसीसी बँकेत पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी
By nisha patil - 10/24/2025 3:09:44 PM
Share This News:
केडीसीसी बँकेत पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी
कोल्हापूर, दि. २२ : दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेकडे ३३ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पाडव्याच्या दिवशी बँकेच्या १९१ शाखा खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. आकर्षक व्याजदरांमुळे ठेवीदारांचा बँकेच्या विविध ठेव योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे शिंदे यांनी सांगितले.
सध्या बँकेच्या ठेवी १०,६३५ कोटी रुपये इतक्या असून, चालू आर्थिक वर्षाअखेर १२,००० कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय बँकेने ठेवले आहे.
केडीसीसी बँकेत पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी
|