ताज्या बातम्या
केदारनाथ दर्शन आता केवळ 36 मिनिटात – अदानी ग्रुपचा नवा रोपवे प्रकल्प सुरू
By nisha patil - 10/16/2025 2:12:45 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. १६ :
केदारनाथच्या भक्तांसाठी शुभ बातमी! पूर्वीच्या आठ तासांच्या कठीण प्रवासाऐवजी आता केदारनाथ दर्शन केवळ 36 मिनिटांत करता येणार आहे. अदानी ग्रुपने उत्तराखंडमधील पवित्र केदारनाथ मंदिराला सोन प्रयागशी जोडणारा अत्याधुनिक रोपवे प्रकल्प सुरू केला आहे.
अलीकडेच गौतम आदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत या प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की या रोपवेमुळे तीर्थयात्रा पूर्वीपेक्षा सोप्या, सुरक्षित आणि जलद होईल.
ही रोपवे व्यवस्था केदारनाथच्या कठीण चढाईसाठी एक मोठी सुविधा ठरणार असून, हजारो भाविकांसाठी वेळ आणि कष्ट दोन्ही बचत होणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मंदिर दर्शन अनुभव पूर्णपणे नवीन आणि आरामदायी पद्धतीने घेतले जाऊ शकणार आहे
केदारनाथ दर्शन आता केवळ 36 मिनिटात – अदानी ग्रुपचा नवा रोपवे प्रकल्प सुरू
|