विशेष बातम्या
कोल्हापूर नागरी विकास आराखडा शहराशी सुसंगत ठेवा – पालकमंत्री आबिटकर
By nisha patil - 10/5/2025 3:46:17 PM
Share This News:
कोल्हापूर नागरी विकास आराखडा शहराशी सुसंगत ठेवा – पालकमंत्री आबिटकर
कोल्हापूर, : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणातील ४२ गावांचा आराखडा तयार करताना तो कोल्हापूर शहराशी सुसंगत असावा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी नाशिक, पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्राधिकरणांचा अभ्यास करून आराखडा तयार करण्याचा सल्ला दिला. रस्ते, आरोग्य, शाळा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यांचा आराखड्यात समावेश करण्यावर त्यांनी भर दिला. बैठकीस आमदार नरके, आमदार महाडीक, जिल्हाधिकारी येडगे व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर नागरी विकास आराखडा शहराशी सुसंगत ठेवा – पालकमंत्री आबिटकर
|