बातम्या
शाळेच्या आठवणी जपत आजरा हायस्कुलच्या 1985च्या बॅचचा सहावा स्नेह मेळावा उत्साहात
By nisha patil - 1/22/2026 1:52:54 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार ) :- आजरा हायस्कूल आजरा 1985 बॅचचा सलग सहावा स्नेहमेळावा आंबोली,जिल्हा सिंधुदुर्ग येथे मोठ्या दिमाखात साजरा करणेत आला. या स्नेहमेळाव्यासाठी(गेट टुगेदर) मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर,रत्नागिरी, बेळगाव,सिंधुदुर्ग इत्यादी ठिकाणी वास्तव्यास असणारे सर्व मित्रमैत्रिणी सलग सहाव्या मेळाव्यात सहभागी झाले.प्रत्येक वर्षी गेटटुगेदर साजरा करणारी ही बॅच महाराष्ट्रात एकमेव असावी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
या स्नेहमेळाव्यात जे आपल्या नोकरी मधून निवृत्ति पत्करलेले आहेत तसेच विवीध माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या मित्र मैत्रिणींचा सत्कार प्रत्येक वर्षी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येतो, तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि फनी गेम्स साजरे करण्यात येतात त्याच प्रमाणे ट्रेकिंग व विविध पर्यटन स्थळांना भेट देऊन माहिती मिळवली जाते, असा हा दरवर्षी आयोजित करण्यात येणारा मेळावा सर्व मित्रवर्गाला आचंबीत करून सोडतो.
आपल्या शालेय जीवनाला उजाळा देत साठी कडे झुकणाऱ्या वयाला पुन्हा सतरा अठरा वर्षात नेऊन आठवणी जाग्या केल्या जातात.. आणि पुन्हा शालेय जीवन भोगतोय या उमेदीने हा स्नेहमेळावा संपन्न झाला.या स्नेहमेळाव्याला एकुण 36 मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते या वर्षीच्या मेळाव्याचे नियोजन अखिल भारतीय मराठा बहुउद्दैशीय संघाचे अध्यक्ष प्रसन्न रामदास शिंदे कोल्हापुर,यांच्या नेतृत्वाखाली संजय शशिकांत त्रिभुवणे, विजय राजाराम देसाई आणि यशवंत कृष्णाजी लाटगांवकर या आजरा वासियांच्या उत्कृष्ट संयोजनातुन स्नेहमेळावा यशस्वीपणे पार पडला.
शाळेच्या आठवणी जपत आजरा हायस्कुलच्या 1985च्या बॅचचा सहावा स्नेह मेळावा उत्साहात
|