बातम्या
कोल्हापूरच्या १२ कबड्डीपटूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजारांचं बक्षीस
By nisha patil - 5/19/2025 4:15:38 PM
Share This News:
कोल्हापूरच्या १२ कबड्डीपटूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजारांचं बक्षीस
ठाणे येथे पार पडलेल्या ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकावलं. या विजयी संघातील १२ खेळाडूंचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक खेळाडूला १० हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.
कबड्डीत यशासाठी जिद्द, चिकाटी आणि सराव महत्त्वाचा असल्याचं मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमात प्रशिक्षक शहाजान शेख, व्यवस्थापक प्रा. संदीप लवटे यांचाही गौरव झाला.
कोल्हापूरच्या १२ कबड्डीपटूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजारांचं बक्षीस
|