विशेष बातम्या
पीएम एफएमई योजनेबाबत खा. महाडिक यांनी वेधले लक्ष
By nisha patil - 12/13/2025 6:26:49 PM
Share This News:
पीएम एफएमई योजनेबाबत खा. महाडिक यांनी वेधले लक्ष
लघु उद्योजक व ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना जेम पोर्टलवर थेट बाजारपेठ
नवी दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण (पीएम एफएमई) योजनेच्या प्रगतीबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. १० हजार कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना लघु उद्योजक, शेतकरी व ग्रामीण महिलांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेतील लाभार्थ्यांना ई-कॉमर्स व राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना केंद्र सरकारने जेम पोर्टलसोबत करार केल्यामुळे आता या योजनेतील लाभार्थ्यांना थेट जेम पोर्टलवर आपली उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करता येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवनित सिंह यांनी दिली.
पीएम एफएमई योजनेबाबत खा. महाडिक यांनी वेधले लक्ष
|