बातम्या

"खुद से जीत" अभियानाचा कागलमध्ये उत्साहात प्रारंभ

Khud Se Jeet


By nisha patil - 7/28/2025 6:49:24 PM
Share This News:



"खुद से जीत" अभियानाचा कागलमध्ये उत्साहात प्रारंभ 🔹

कागल, दि. २८: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते "खुद से जीत" या समाजोपयोगी अभियानाचा प्रारंभ सौ. सरलादेवी माने हायस्कूल येथे उत्साहात झाला. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा लाख विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी आणि गरजूंना मोफत चष्मे वाटप होणार आहे. तसेच दोन लाख मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरमुक्ती लसीकरण मोफत करण्यात येणार आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी लसीकरणाचे महत्व सांगत उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. पहिल्या टप्प्यात कागल तालुक्यात ५० हजार विद्यार्थ्यांची तपासणी होणार आहे. कार्यक्रमास नेत्रतज्ज्ञ डॉ. सतीश देसाई, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. एस. एस. मोरे, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. रामचंद्र सातवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


"खुद से जीत" अभियानाचा कागलमध्ये उत्साहात प्रारंभ
Total Views: 98